Karmyogini Sharadabai Pawar
कर्मयोगिनी शारदाबाई पवार
Sharadabai was born to Krishnarao Bhosle and Laxmibai in Golivade, near Panhala Fort in Kolhapur district, Maharashtra. Having lost her father at an early age, she was influenced by the progressive values of Kakasaheb Jadhav. She drew inspiration for social awakening from Sevasadan in Pune. Later, she married Govindrao Pawar of Baramati in the Satyashodhak tradition. Beginning her married life from humble circumstances, she made significant contributions to family, social and political life.
In 1938, Sharadabai was elected unopposed as the sole woman candidate to the Pune District Local Board, laying the foundation for rural development. Over fourteen years, she served on various committees, prioritizing the everyday concerns of ordinary people. As Chairperson of the Construction Committee, she oversaw the construction of more than fifty roads connecting villages. While managing her home and farm and raising eleven children with strong values, she paved the way for future generations of women leaders through her oratory and achievements in public life. A rationalist, she fought against ignorance, superstition and social inequality. Even after disability affected her in later life, she remained committed to her family and society.
Breaking through the barriers of a male-dominated society, Sharadabai carved a path as a strong, principled and progressive leader, leaving an indelible mark during her 63-year life journey. Her commitment to education, values and foresight are also reflected in the remarkable achievements of her children in various fields. Sharad Pawar received the 'Padma Vibhushan', while Appasaheb and Prataprao received the 'Padma Shri'. These honours are the greatest gift to nation-building from the 'university' called Mother Sharadabai.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाजवळील गोलिवडे येथे कृष्णाराव भोसले व लक्ष्मीबाई यांच्या पोटी शारदाबाईंचा जन्म झाला. लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या शारदाबाईंवर पुरोगामी विचारांच्या काकासाहेब जाधवांचे संस्कार झाले. पुण्यातील 'सेवासदन'तून त्यांना प्रबोधनाची प्रेरणा मिळाली. पुढे शारदाबाईंचा विवाह बारामतीच्या गोविंदराव पवार यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने झाला. शून्यातून संसाराची सुरुवात करत त्यांनी कौटुंबिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली.
शारदाबाईंनी १९३८ मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डावर एकमेव महिला उमेदवार म्हणून बिनविरोध निवडून येत ग्रामीण विकासाची पायाभरणी केली. सलग चौदा वर्षे विविध समित्यांवर कार्यरत राहून त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. बांधकाम समितीच्या अध्यक्षपदाच्या काळात खेड्यांना जोडणारे पन्नासहून अधिक रस्ते बांधले. घर व शेती सांभाळत अकरा अपत्यांना संस्कार देतानाच त्यांनी सार्वजनिक जीवनात आपल्या वक्तृत्व व कर्तृत्वाने पुढील पिढीतील महिला नेतृत्वाची वाट सुकर केली. बुद्धिप्रामाण्यवादी शारदाबाईंनी अज्ञान, अंधश्रद्धा व सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष केला. आयुष्याच्या उत्तरार्धात अपंगत्व आले तरी त्यांनी कौटुंबिक व सामाजिक बांधिलकी जपली.
पुरुषप्रधान व्यवस्थेची तटबंदी भेदून कणखर, तत्त्वनिष्ठ व पुरोगामी नेतृत्वाची वाट चालणाऱ्या शारदाबाईंनी आपल्या ६३ वर्षांच्या जीवनप्रवासात स्वकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला. त्यांच्या शिक्षणाची तळमळ, दूरदृष्टी यांची प्रचिती त्यांच्या मुलांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीतूनही दिसून येते. शरद पवार यांना 'पद्मविभूषण', तर अप्पासाहेब व प्रतापरावांना 'पद्मश्री' पुरस्कार हे सन्मान म्हणजे मातोश्री शारदाबाई नावाच्या 'विद्यापीठा'ने राष्ट्रउभारणीला दिलेली अमूल्य भेट आहे.