Intellectual Heritage

वैचारिक वारसा

Many great individuals played a pivotal role in laying the foundation of modern India by breaking the shackles of social and mental enslavement, dismantling the impenetrable walls of caste discrimination, and removing the evils of ignorance. Two and a half millennia ago, Gautama Buddha rejected social inequality and established an egalitarian Dhamma, founded on wisdom, moral conduct and compassion, and carrying a message of peace.

The flame lit by Gautama Buddha was kept alive by many great individuals through their sacrifice and achievements. Rajmata Jijau sowed the seed of Swaraj, which Chhatrapati Shivaji Maharaj nurtured. He united people from diverse castes and communities and built the edifice of Swaraj. Carrying forward the legacy of Swaraj and public welfare, Ahilyadevi Holkar, Sayajiraje Gaekwad and Rajarshi Shahu Maharaj used their royal authority to promote justice, equality and fraternity. The Phule couple built an alternative culture to ensure human dignity and opened the doors of education to the Bahujan masses. Mahatma Gandhi adopted the path of non-violence and brought the entire Indian society into the freedom struggle. Dr. Babasaheb Ambedkar gave constitutional protection to India’s liberty, equality and fraternity. Karmaveer Bhaurao spread self-reliant education for the welfare of the people. Sharadabai Pawar showed rural youth the path to progress. Comrade Anna Bhau Sathe rooted the idea of total revolution in the public consciousness through his literature and Shahiri. Yashwantrao Chavan strengthened the institutional foundations while building a modern and cultured Maharashtra. The thoughts and deeds of all these great individuals remain a living source of inspiration, kindling the flame of self-respect, freedom, equality, unity and progress in future generations.

सामाजिक, मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून, जातिभेदाच्या अभेद्य भिंती फोडून, अविद्येचा अनर्थ दूर करून आधुनिक भारताची पायाभरणी करण्यात अनेक महान व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी समाजातील विषमता नाकारून प्रज्ञा, शील व करूणेच्या पायावर शांततेचा संदेश देणाऱ्या समतावादी धम्माची स्थापना केली.

गौतम बुद्धांनी पेटवलेली ही ज्योत पुढे अनेक महनीय व्यक्तींनी आपल्या त्यागाने व कर्तृत्वाने तेवत ठेवली. राजमाता जिजाऊंनी पेरलेले स्वराज्याचे बीज छत्रपती शिवरायांनी वाढवले. अठरापगड जातींना एकत्र आणून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. स्वराज्य आणि लोककल्याणाचा वारसा घेऊन अहिल्यादेवी होळकर, सयाजीराजे गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राजसत्तेचा उपयोग न्याय, समता, बंधुता वाढवण्यासाठी केला. फुले दाम्पत्याने माणूसपणाचे हक्क सर्वांना मिळावेत, यासाठी पर्यायी संस्कृती उभारत बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग अवलंबून स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण भारतीय समाजाला सामील करून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेला घटनात्मक कवच दिले. कर्मवीर भाऊरावांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वावलंबी शिक्षण सर्वत्र पोचवले. शारदाबाई पवारांनी ग्रामीण भागातील तरूणाईला प्रगतीची वाट दाखवली. कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंनी साहित्य, शाहिरीतून संपूर्ण क्रांतीचा विचार जनमनात रुजवला. यशवंतराव चव्हाणांनी आधुनिक व सुसंस्कृत महाराष्ट्राची उभारणी करताना संस्थात्मक पाया बळकट केला. या सर्व थोर माणसांचे विचार व कार्य म्हणजे पुढील पिढ्यांमध्ये स्वाभिमानाची, स्वातंत्र्याची समतेची, एकतेची आणि प्रगतीची ठिणगी पेटवणारे जिवंत प्रेरणास्थान आहे.