Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराज
Chhatrapati Shivaji Maharaj, who gave concrete form to the idea of Swarajya, was born at Shivneri Fort. His personality was shaped by the guidance of his father, Shahaji Maharaj, and the values imparted by his mother, Rajmata Jijabai. Recognising the strategic importance of forts such as Torna, Rajgad, Pratapgad, Sinhagad and Raigad, he established a strong fortification system, captured enemy-held forts, built new ones and expanded Swarajya with his associates.
Making effective use of the Sahyadri terrain, he employed guerrilla warfare in his conflicts with the Adilshahi and Mughal powers. The defeat of Afzal Khan, the attack on Shaista Khan, the Surat campaign and his escape from Agra were notable examples of his military strategy. Recognizing the importance of maritime security, he established a naval force. He organized the administration through the Ashtapradhan Mandal, or Council of Eight Ministers. He improved the revenue system through land measurement, giving priority to farmers' interests. Respect for women, the protection of his subjects and the safeguarding of places of worship of different faiths were also important aspects of his governance. His coronation at Raigad on 6 June 1674 marked the formal establishment of Swarajya as a sovereign kingdom.
By giving importance to public welfare, justice and discipline, Shivaji Maharaj established a model of independent state administration. The concern for the welfare of his subjects expressed in his royal seal reflects his vision of governance. Through Swarajya, he brought together state-building, administration, defence and public welfare. His contribution to state-building, people-centred administration and effective leadership remains unparalleled in Indian history.
स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. वडील शहाजीराजेंचे मार्गदर्शन आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडला. तोरणा, राजगड, प्रतापगड, सिंहगड, रायगड यांसारख्या किल्ल्यांचे महत्त्व ओळखून त्यांनी भक्कम दुर्गव्यवस्था उभारली. पुढे सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी शत्रूच्या ताब्यातील अनेक किल्ले जिंकले, काही नव्याने बांधले आणि स्वराज्याचा विस्तार केला.
सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेचा लाभ घेत त्यांनी गनिमी काव्याचा प्रभावी वापर करून आदिलशाही आणि मुघल सत्तेविरुद्ध संघर्ष केला. अफझलखानाचा पराभव, शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, सुरतेवरील मोहीम आणि आग्र्याहून सुटका या त्यांच्या संरक्षणनीतीच्या उल्लेखनीय घटना आहेत. सागरी सुरक्षेचे महत्त्व ओळखून त्यांनी आरमार उभारले. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून प्रशासनाची रचना केली. जमिनीची मोजणी करून महसूलव्यवस्था अधिक चांगली केली आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. स्त्रियांचा सन्मान, प्रजेची सुरक्षितता आणि सर्वधर्मीय श्रद्धास्थानांचे संरक्षण यांनाही त्यांच्या राज्यकारभारात महत्त्व होते. ६ जून, १६७४ रोजी रायगडावर झालेल्या राज्याभिषेकाने स्वराज्याला औपचारिक सार्वभौम राजसत्तेचे स्वरूप प्राप्त झाले.
राज्यकारभारात लोककल्याण, न्याय आणि शिस्त यांना महत्त्व देत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्यव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या राजमुद्रेतील प्रजाहिताची भावना त्यांच्या राज्यदृष्टीचे सार व्यक्त करते. स्वराज्याच्या माध्यमातून त्यांनी राज्यनिर्मिती, प्रशासन, संरक्षण आणि लोककल्याण यांचा समन्वय साधला. भारतीय इतिहासात स्वतंत्र राज्यनिर्मिती, लोकाभिमुख प्रशासन आणि प्रभावी नेतृत्वाचा आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कालातीत आहे.