Karmaveer Bhaurao Patil
कर्मवीर भाऊराव पाटील
Bhaurao Patil was born to Paygonda Patil and Gangubai in Kumbhoj village, Kolhapur district, Maharashtra. After primary education, he came to the princely state of Kolhapur for English education. His courageous and rebellious spirit was further sharpened through his association with Shahu Maharaj. Molded by the Satyashodhak movement, Bhaurao founded the Rayat Shikshan Sanstha on 4 October 1919, under difficult pre-independence conditions, bringing the stream of education to the doorsteps of the rural masses through self-reliance.
Through the Satyashodhak movement, Bhaurao examined society's strengths and shortcomings, while through the Rayat Shikshan Sanstha he provided educational opportunities to the emerging rural youth. By establishing the Chhatrapati Shahu Boarding House in Satara for students of all castes and religions, he broke down barriers of caste and creed. He turned the stones of social ostracism hurled by orthodox society into the foundation of his institution. Trusting the generosity of the Rayat and his own determination, he established schools, hostels and colleges. Advocating self-reliant education alongside traditional education, he gave the guiding motto, 'Earn and Learn.' Through these hostels, he nurtured fearless, self-respecting and self-reliant Rayat Sevaks to carry forward his mission. Bhaurao and his wife, Laxmibai, dedicated themselves wholly to the Rayat Shikshan Sanstha.
In the first two decades of the twentieth century, when Maharashtra faced educational, social and economic constraints, Bhaurao opened pathways to knowledge for the masses through the Rayat Shikshan Sanstha. A progressive humanist and champion of social emancipation, Karmaveer Bhaurao dedicated his entire life to the educational upliftment of marginalized communities.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी पायगोंडा पाटील व गंगूबाई या दाम्पत्याच्या पोटी भाऊरावांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणानंतर इंग्रजी शिक्षणासाठी ते शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानात आले. भाऊरावांच्या मूळच्या धाडसी, बंडखोर स्वभावाला शाहू महाराजांच्या सहवासात अधिक धार लाभली. सत्यशोधक चळवळीच्या मुशीत तयार झालेल्या भाऊरावांनी स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिकूल परिस्थितीत ४ ऑक्टोबर १९१९ रोजी, 'रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना करून स्वावलंबनातून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यातील बहुजनांच्या दारात नेली.
भाऊरावांनी सत्यशोधक चळवळीद्वारे समाजाच्या गुणदोषांची चिकित्सा केली आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उगवत्या ग्रामीण तरुण पिढीला रचनात्मक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. साताऱ्यात सर्व जातीधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू बोर्डिंग सुरू करून जातीधर्माच्या भिंती पाडल्या. तत्कालीन कर्मठ समाजाने भिरकावलेल्या बहिष्काराच्या दगडांचा वापर त्यांनी संस्थेच्या पायाभरणीसाठी केला. स्वतःच्या कर्तृत्वशक्तीस आव्हान देत व रयतेच्या दातृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी एकामागून एक शाळा, वसतिगृहे, महाविद्यालये काढली. पारंपरिक शिक्षणपद्धतीला पूरक अशा स्वावलंबी शिक्षणाचा विचार मांडून 'कमवा व शिका' हा मूलमंत्र दिला. या वसतिगृहातून त्यांनी आपल्या कार्याची धुरा वाहणारे, निर्भय, स्वाभिमानी, आत्मनिर्भर 'रयत सेवक' तयार केले. भाऊराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी रयत शिक्षण संस्थेच्या संसारासाठी सर्वस्व अर्पण केले.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक कोंडीत असलेल्या महाराष्ट्रात भाऊरावांनी 'रयत शिक्षण संस्थे'च्या माध्यमातून ज्ञानाच्या वाटा बहुजनांसाठी मोकळ्या करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. प्रागतिक, मानवतावादी, सामाजिक मुक्तीचे पुरस्कर्ते असलेल्या कर्मवीर भाऊरावांनी आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित समाजाच्या शैक्षणिक उत्थानासाठी समर्पित केले.