Nakshatra Udyan
नक्षत्र उद्यान
Where tradition, plants and sustainable practice come together
परंपरा, वनस्पतीविज्ञान आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचा संगम
Developed under the guidance of Padma Vibhushan Shri Sharadchandraji Pawar, and through the work of Vidya Pratishthan’s Biotechnology and Botany departments, Nakshatra Udyan brings the 27 Nakshatras and 12 Rashis into a 36-acre landscape around Prerna Sthal. The garden connects traditional plant knowledge with education, research and responsible environmental practices. पद्मविभूषण श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्या प्रतिष्ठानच्या जैवतंत्रज्ञान व वनस्पतीशास्त्र विभागांच्या प्रयत्नांतून नक्षत्र उद्यान साकारले आहे. ३६ एकरांच्या या परिसरात २७ नक्षत्रांशी आणि १२ राशींशी संबंधित वृक्ष व वनस्पतींची मांडणी करण्यात आली आहे. पारंपरिक ज्ञान, वनस्पतींचा अभ्यास आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन यांचा येथे संगम पाहायला मिळतो.
Research, community connection and ecological care
संशोधन, समाजप्रबोधन आणि पर्यावरण संवर्धन
A thoughtful blend of traditional plant heritage and scientific study at Vidya Pratishthan, Baramati.
विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील पारंपरिक वनस्पती ज्ञान आणि शास्त्रीय अभ्यासाचा सुरेख संगम.
"Nakshatra Udyan is a practical example of research and community outreach, connecting traditional plant knowledge with modern education and sustainable practices." "नक्षत्र उद्यान हे पारंपरिक वनस्पती ज्ञान, आधुनिक शिक्षण आणि शाश्वत जीवनपद्धती जोडणारे संशोधन व समाजप्रबोधनाचे एक सुंदर उदाहरण आहे."
Conceived and developed by the Biotechnology and Botany departments across 36 acres, under the guidance of Padma Vibhushan Shri Sharadchandraji Pawar, Nakshatra Udyan was created to give students, researchers and visitors a practical setting for studying medicinal flora.
The landscape preserves indigenous trees, supports botanical coursework, and introduces visitors to traditional systems of plant use in an accessible, open-air setting.
पद्मविभूषण श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या प्रतिष्ठानच्या जैवतंत्रज्ञान आणि वनस्पतीशास्त्र विभागांनी ३६ एकरांवर नक्षत्र उद्यानाची उभारणी केली. विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांना औषधी वनस्पतींचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा हा यामागचा मुख्य हेतू आहे.
हे उद्यान स्थानिक वृक्षांचे जतन करते, वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासास मदत करते आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या पारंपरिक वनस्पती वारशाची सोप्या पद्धतीने ओळख करून देते.
Understanding plants through tradition and science
परंपरा आणि विज्ञानातून वनस्पतींची ओळख
Traditional texts connect specific trees with the 12 Rashis and 27 Nakshatras, reflecting how deeply nature was woven into daily observation.
प्राचीन संदर्भांमध्ये १२ राशी आणि २७ नक्षत्रांचा संबंध विशिष्ट वृक्षांशी जोडला आहे. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची ही एक पारंपरिक पद्धत आहे.
Traditional Associations
पारंपरिक दृष्टिकोन
In Indian tradition, each Nakshatra is associated with a specific tree. While historically viewed through cosmic and seasonal markers, these associations encouraged communities to plant, protect and value a wide variety of native trees.
भारतीय परंपरेत प्रत्येक नक्षत्राचा संबंध एका विशिष्ट वृक्षाशी जोडलेला आहे. हे वृक्ष ऋतुचक्र आणि खगोलीय घडामोडींशी जोडले गेल्यामुळे समाजाने त्यांचे पिढ्यान् पिढ्या जतन केले.
Botanical & Medicinal Study
शास्त्रीय व औषधी अभ्यास
At Vidya Pratishthan, students and researchers examine these trees for their active compounds, studying practical uses such as antimicrobial, anti-inflammatory and antioxidant properties found in bark, leaves and fruit.
विद्या प्रतिष्ठानमध्ये या वृक्षांमधील घटकांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. वनस्पतींची साल, पाने आणि फळांमधील औषधी गुणधर्मांवर येथे विद्यार्थी व संशोधक संशोधन करतात.
Natural Environment & Well-being
शांत परिसर आणि निसर्गानुभव
The walkways are lined with shady, air-purifying trees that create a calm, cool environment. Walking through these groves in the early morning offers fresh air, shade and a quiet setting for mindful reflection.
उद्यानातील मार्ग सावली देणाऱ्या आणि हवा शुद्ध करणाऱ्या वृक्षांनी वेढलेले आहेत. सकाळी या मार्गांवरून चालताना मिळणारी ताजी हवा, शांतता आणि गारवा मन प्रसन्न करतो.
27 Nakshatras & Their Trees
२७ नक्षत्रे आणि त्यांचे वृक्ष
Explore each birth constellation, its paired native tree, botanical name and practical uses.
आपले जन्म नक्षत्र, त्याच्याशी संबंधित वृक्ष, शास्त्रीय नाव आणि त्याचे औषधी उपयोग जाणून घ्या.
The 12 Rashi Groves
१२ राशींचे वृक्ष विभाग
Alongside the 27 Nakshatra sectors, dedicated groves represent the 12 Rashis (Zodiac signs), bringing together key trees from across the landscape.
२७ नक्षत्र विभागांसोबतच उद्यानात १२ राशींसाठी स्वतंत्र वृक्ष विभाग तयार करण्यात आले आहेत.
Vrishabhaवृषभ
Mithunaमिथुन
Karkaकर्क
Simhaसिंह
Kanyaकन्या
Tulaतूळ
Vrishchikaवृश्चिक
Dhanuधनु
Makaraमकर
Kumbhaकुंभ
Meenaमीन
100% STP Recycled Water & Responsible Care
१००% प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर
Vidya Pratishthan recycles wastewater from the campus through its Sewage Treatment Plant to irrigate the entire 36-acre landscape.
विद्या प्रतिष्ठान संकुलातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ३६ एकरांच्या संपूर्ण उद्यानासाठी त्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो.
Sustainable Campus Water Management शाश्वत जलव्यवस्थापनाचा आदर्श
Maintaining 36 acres of trees and gardens in Baramati requires thoughtful planning. Vidya Pratishthan installed a centralized Sewage Treatment Plant (STP) that collects and treats wastewater from academic buildings, hostels and campus facilities every day.
The treated water supplies drip-irrigation networks, garden channels and ponds around Prerna Sthal. This dependable supply keeps the landscape green year-round and creates a noticeably cooler microclimate across the grounds.
बारामतीसारख्या भागात ३६ एकरांचे उद्यान हिरवेगार ठेवण्यासाठी योग्य नियोजनाची गरज असते. विद्या प्रतिष्ठानने संकुलातील वसतिगृहे आणि इतर इमारतींमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारला आहे.
प्रक्रिया केलेले पाणी ठिबक सिंचन आणि प्रेरणा स्थळाभोवतीच्या तलावांमध्ये वापरले जाते. यामुळे बारामतीच्या उन्हाळ्यातही उद्यान वर्षभर हिरवेगार राहते आणि परिसरातील हवा थंड राहते.
Campus Collection
पाणी संकलन
Wastewater from campus buildings and residential facilities is gathered into a central treatment system.
परिसरातील इमारती आणि वसतिगृहांमधून सांडपाणी एकत्र केले जाते.
Treatment & Filtration
प्रक्रिया आणि शुद्धीकरण
Multi-stage biological processing and filtration clean the water safely for landscape irrigation.
जैविक प्रक्रिया आणि गाळणीनंतर हे पाणी झाडांसाठी वापरण्यायोग्य होते.
Drip Networks & Ponds
ठिबक सिंचन आणि तलाव
Treated water flows through drip-irrigation lines to nourish Nakshatra trees, Rashi groves and surrounding water bodies.
हे पाणी ठिबक सिंचनाद्वारे सर्व नक्षत्र वृक्ष, राशी कुंज आणि तलावांमध्ये पोहोचवले जाते.
The landscape around the dome
घुमटाभोवतीचा निसर्गरम्य परिसर













The Green Setting Around Prerna Sthal प्रेरणा स्थळाभोवतीचा हिरवा परिसर
Nakshatra Udyan forms a natural, peaceful perimeter around the central meditation dome of Prerna Sthal. Walking through shaded pathways under native trees allows visitors to transition from the active town of Baramati into a quiet, focused state of mind before stepping inside.
नक्षत्र उद्यान प्रेरणा स्थळाच्या ध्यान घुमटाभोवती एक शांत आणि नैसर्गिक वातावरण तयार करते. रोजच्या धावपळीतून आल्यानंतर या झाडांच्या सावलीतून चालताना मन शांत होते आणि ध्यान सभागृहात प्रवेश करण्यापूर्वीच ते एकाग्र होऊ लागते.
Visiting Nakshatra Udyan
नक्षत्र उद्यानास भेट
The garden is open to students, researchers, nature lovers and the public every day, free of cost.
विद्यार्थी, संशोधक, निसर्गप्रेमी आणि सर्व नागरिकांसाठी हे उद्यान दररोज विनामूल्य खुले असते.
Timings वेळ
5:00 AM to 7:00 PM
Open Monday through Sunday, 365 days a year. Early mornings (5:30 AM to 8:00 AM) and evenings (5:00 PM to 6:45 PM) are particularly pleasant for walks.
सोमवार ते रविवार, वर्षभर खुले. सकाळी (५:३० ते ८:००) आणि संध्याकाळी (५:०० ते ६:४५) भेट देणे अधिक आल्हाददायक ठरते.
Location & Access पत्ता आणि मार्ग
Vidya Pratishthan Campus
Jalochi Road, Vidyanagari, MIDC, Baramati, Maharashtra 413133. Located within the campus near the engineering and biotechnology institutions.
विद्यानगरी, जळोची रोड, एमआयडीसी, बारामती, महाराष्ट्र 413133. अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाजवळ.
📍 Open in Google Mapsगुगल मॅप्सवर पहा ↗
Visitor Guidelines मार्गदर्शक सूचना
Please maintain a quiet, respectful atmosphere. Do not pluck leaves, flowers or medicinal bark. Walk along the paved paths to protect tree roots and plant beds. परिसराचे पावित्र्य आणि शांतता राखावी. झाडांची पाने, फुले किंवा साल तोडू नये. झाडांच्या मुळांना इजा होऊ नये म्हणून पदपथांवरूनच चालावे.